गौरी गडाख यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- गौरी गडाख यांच्या पार्थिवावर सोनईच्या अमधाममध्ये शोकाकूल वातावरणात सोनईतल्या वांबोरीरस्त्यालगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे पुतणे उदयन गडाख यांनी मुखाग्नि त्यांना दिला. यावेळी राज्याचे मृद आणि जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख,

शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, डाॅ. सुभाष देवढे, प्रशांत गडाख, विजय गडाख, सुनिल गडाख, अहमदनगरचे आ. संग्राम जगताप आदींसह गडाखांचे नातेवाईक, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारी तीनच्या सुमारास गौरी यांचं पार्थिव औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून सोनईत आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, या अंत्यविधीसाठी लोणी परिसरातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा तालुक्यातून गडाख कुटुंबियांवर प्रेम करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment