अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 मध्ये घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता 5 वी ) व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) फेब्रुवारी ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे.
चालू शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी साधारणत: ऑक्टोबरमध्ये सुरू होते. याच कालावधीत परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात.
परंतु यंदा कोरोनामुळे आधीच्याच (फेब्रुवारी 2020) परीक्षेचा निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात (2020-21) शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती.
त्याप्रमाणे आता राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान पुढील महिन्यात शाळा सुरू होण्याचे संकेत शालेय शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर ती परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी ऐवजी एप्रिलच्या तिसर्या किंवा चौथ्या रविवारी परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. सदर त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून यावर्षीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्यात येणार आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved