धक्कादायक! विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता महिलेचा मृतदेह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- महिला आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. कौटुंबिक छळातून महिलांच्या आत्महत्या घडत असताना आणखी एक धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडली आहे.

राहाता शहरातील अस्तगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या बाबत समजलेली माहिती अशी कि,

अलका भाऊसाहेब भगत असं या मृत महिलेचं नाव आहे. मयत महिलेने शहरातील अस्तगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झाले आहे.

दरम्यान परिसरातील नागरिकांनी विहिरीत तरंगणारा मृतदेह बघितल्यांनंतर याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना कळवली. राहाता पोलीस ठाण्याचे अधिकारी सुभाष भोये आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत, घटनेचा पंचनामा केला. त्यांनतर शव विच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह राहाता ग्रामिण रुग्णालयात पाठवण्यात आला.

अलका भगत हिने आत्महत्या का केली…? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, राहाता पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात महिला आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment