महावितरणच्या चुकीमुळे ऐन दिवाळीत ‘या’ गावांची बत्ती गुल होण्याची शक्यता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-वर्षाचा सणदिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.

महावितरणच्या चुकीमुळे ऐन दिवाळीच्या सणामध्ये नेवासा तालुक्यातील अनेक गावांची बत्ती गुल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील 220 केव्ही वीज उपकेंद्राकडे असलेली 18 लाख 72 हजार 971 रुपयांची कर थकबाकी वसुलीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतीने (दि.9 नोव्हेंबर) रोजी सौंदाळा वीज उपकेंद्राला सील ठोकले आहे.

दरम्यान वीज कंपनीने थकीत कर रक्कम न भरल्याने सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळी तसेच ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे आदी थकीत कर वसुलीसाठी गेले असता कार्यकारी अभियंता प्रशांत यादव ह्यांच्याशी चर्चा झाली.

सकारात्मक चर्चा न झाल्याने ग्रामपंचायतीने थकबाकी भरणे बाबदची लेखी हमी देण्याची मागणी केली असता अभियंता यादव यांनी नकार दिल्याने अखेर ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्र सील केले आहे. उपकेंद्र “सील’ केल्याने उपकेंद्रात एखादा बिघाड झाला, तर त्याअंतर्गत येणाऱ्या,

नगर जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांसह मराठवाड्यातील औरंगाबाद व बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन वीज केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील नागरिकांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्‍यता आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe