अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे.
दरम्यान जामखेड तालुक्यात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात २३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याच्रे निष्पन्न झाले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचा हलगर्जीपणा मुळे हे संकटे ओढवली जात आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणावळीत कोरोना बाधित व्यक्तींनी जेवण वाढण्याचे काम केले यामुळे ते अनेकांच्या संपर्कत आले. दरम्यान आतापर्यंत १३९ नागरिकांनी रॅपिड अंटीजेन टेस्ट केली त्यामध्ये २३ जण बाधीत आढळून आले आहे.
दरम्यान आजही मोठ्या प्रमाणावर अँटिजेन टेस्ट करण्यासाठी पुढे येतील त्यामुळे आकडा वाढू शकतो तसेच अनेक जण रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये निगेटिव्ह येतात पण आर टी पि सी आर चाचणीत पॉझिटिव्ह येतात त्यामुळे सर्वांची आर टी पि सी आर चाचणी बंधनकारक करणे गरजेचे आहे.
या सप्ताहात आसपासच्या गावातील नागरिकांनी हजेरी लावली त्यामुळे रूग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोणतेच धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमावर बंधन असताना आयोजकांनी कोणाच्या परवानगीने सप्ताह आयोजित केला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले नियम व अटींना पायदळी तुडवत आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात नागरिकांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे यामधून निषपन्न झाले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved