अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्या येथील नियोजित मंदिराचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑगस्ट रोजी झाला.
तसेच मंदिर निर्माणचे कार्यही हळूहळू प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. दरम्यान अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी दि.10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता बैठकीचे पहिले सत्र होणार आहे.
त्यानंतर बुधवार दि. 11 नोव्हेंबर रोजी बैठकीचे दुसरे सत्र सकाळी 9 वाजता होणार आहे. तसेच या महत्वपूर्ण बैठकीसाठी श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांना या बैठकीचे निमंत्रण आले असून
ते या बैठकीसाठी सोमवारी सायंकाळी विमानाने रवाना झाले आहेत. या बैठकीच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे, केंद्रीय मंत्री अशोक तिवारी, उपाध्यक्ष जिवेश्वर मिश्र यांनी आपल्या स्वाक्षरीद्वारे भास्करगिरी महाराजांना निमंत्रण दिले आहे.
या बैठकीदरम्यान मंदिर निर्मितीसाठी अजून काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा होणार आहे. याबाबत आपणही सूचना द्याव्यात यासाठी महंत भास्करगिरी महाराज यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved