अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. यानुसार पोलिसांना दंड वसुलीचे अधिकार दिले आहेत. ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दंडात्मक कारवाई पोलिसांना करता येणार आहे.
जिल्हाधिकारी भोसले यांनी पोलिसांना वेगवान कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील स्थानिक पोलिसांना कारवाईसाठी विशेष मोहीम राबवावी, असे सांगितले आहे.
विना मास्क फिरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १०० रूपयापर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे. दरम्यान दिवाळीमुळे शहरात सर्वत्र नागरिकांकडून गर्दी केली जाऊ लागली आहे.
तसेच यावेळी नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा मंदावलेला वेग पुन्हा सक्रिय होऊ नये यासाठी प्रशासनाने खंबीर पाऊले उचलली आहे. यास नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे .
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved