रस्तालूट करणाऱ्याआरोपीला अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शाहरुख अन्वर कोथमिरे (वय २६, रामनगर वॉर्ड १ श्रीरामपूर) हे मोटारसायकलीवर २ नोव्हेंबरला शिरसगाव रोडने जात असताना ओव्हरब्रिजजवळ पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांना अडवून खिशातील ३ हजार रुपये व मोबाइल लांबवला.

या प्रकरणी गौरव संजय रहाटे (दत्तनगर, श्रीरामपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. गुन्ह्याचा समांतर तपास करताना सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना हा गुन्हा रहाटे याने केल्याचे गोपनीय माहिती मिळाली.

हेकॉ मनोहर गोसावी, रवि सोनटक्के, रणजित जाधव, रोहित येमूल, विजय धनेधर, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, बबन बेरड यांनी दत्तनगर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली देत मुद्देमाल पोलिसांना काढून दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment