दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच दोन बालकांचा विहिरीत पडून मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीचा सण आला असून सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यातून अत्यंत दुखांकित बातमी समोर येत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात राहणाऱ्या कांतीलाल सोनवणे यांची दोन लहान मुले आविष्कार सोनवणे व कार्तिक सोनवणे हे दोघे घराशेजारी असलेल्या विहिरीजवळ खेळत असताना पाय पाय घसरून पडले.

ते बराच वेळ आढळून न आल्याने सोनवणे परिवाराने आपल्या लेकरांची शोधमोहीम सुरू केली. यातील आविष्कार याचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आल्याने त्यानंतर कुटुंबीयांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला.

विहरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने चार वर्षीय कार्तिक याचा मृतदेह सापडत नसल्याने मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक तरुणांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत केले.

शनिवारी रात्री दोन वाजता कार्तिकचा मृतदेह विहीरातून बाहेर काढण्यात आला. या चिमुकल्यांचे मृतदेह पाहून आई-वडीलांनी हंबरडाच फोडला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment