अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- ऐन दिवाळीत एका २२ वर्षीय तरुणीवर प्रियकराने ॲसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. यात सुमारे ४८ टक्के भाजलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या प्रियकराचा शोध घेत आहेत. सविस्तर वृत्त असे की, मृत पीडिता ही नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील रहिवासी होती. पीडितेचा तीन महिन्यांपूर्वी अन्य एका मुलाशी विवाह झाला होता.
मात्र, तिचे गावातील अविनाश राजूरे याच्यासोबत प्रेम होते आणि ते दोघे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होती. लग्नानंतरही प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ देण्याच्या एकमेकांनी शपथा घेतल्या. दोघेही गावातून पलायन करून पुण्यात एकत्र राहत होते. मात्र, तिथे या दोघांमध्ये वाद होऊ लागले.
दरम्यान दिवाळीनिमित्त शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली.
तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. हे कृत्य करून अविनाशने तिला त्याच स्थितीत सोडून तेथून पळ काढला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved