अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात गेले अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेत व भाविकांची श्रद्धा लक्षात घेत धार्मिक स्थळे खुली करण्याचे जाहीर केले.
त्यानुसार कालपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी मात्र एक चूक केली. कारण कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही, यासाठी सरकारने ठरवून दिलेले नियमांचे पालन करणे आवश्यक होते.
मात्र शिर्डी येथील साईमंदिरात पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. संस्थान प्रशासनाने भाविकांसाठी तयार केलेल्या सोशल डिस्टंसींगच्या नियमावलीचे खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच. बगाटे आणि त्यांच्या पत्नी यांनीच नियम मोडल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला आहे.
दरम्यान याप्रकरणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व प्रकरणाची माहिती देणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंदिर उघडण्यापूर्वी प्रशासनाची व मंदिर समितीची बैठक पार पडली, या बैठकीत भाविकांसाठी तयार केलेली नियमावलीचे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बगाटे यांनी उल्लंघन केल्याचा
आरोप खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला. खासदार लोखंडे म्हणाले कि, मी काकड आरतीला स्वतः उपस्थित होतो, त्यावेळी शिर्डी ग्रामस्थ देखील होते. शासकीय आदेशानुसार दर्शनबारीत, तसेच गाभाऱ्यात सोशल डिस्टंसींगचे पालन झाले पाहिजे यासाठी मार्किंग करण्यात आली होती,
मात्र या मार्किंगमध्ये बगाटे आणी त्यांच्या पत्नी उभे न राहाता त्यांनी नियमावलीचे उल्लंघन करत सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडवला आहे. दरम्यान सर्व साधारण भाविकास एक नियम आणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक असे होवू शकत नाही.
याबाबत अनेक वर्षापासून मंदिरात काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यायला हवा होता मात्र तसे न करता स्वताच निर्णय घेत असल्याने हि भुमिका योग्य अहमदनगर नसल्याचे त्यांनी सांगितले. आँनलाईन पासेसचा देखील फज्जा उडाला असल्याचे खा.लोखंडे यांनी म्हटले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved