बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लागेना, कुटुंबियांची चिंता वाढली, पोलिस अधीक्षकांना साकडं

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  नगरच्या माळीवाडा परिसरातील गोंधळे गल्ली येथून बेपत्ता झालेला सार्थक किरण पठारे (बाल्या) या मुलाचा अद्याप शोध लागलेला नसल्याने चिंता वाढलीआहे.

दि. 13 नोव्हेंबर रोजी घराजवळून गोंधळे गल्ली, बंगालचौकी, माळीवाडा जवळुन सार्थक बेपत्ता आहे. चार पाच दिवस होऊन देखील तो सापडला नाही.

त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुलाच्या घरच्यांसमवेत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, मुलाचे कुटुंबिय उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधून संबंधित मुलाचा शोध लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment