अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- आपल्या देशातील शेतकर्यांच्या स्थितीबद्दल सर्वाना चांगले माहिती आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरावे लागते.
पण असे काही शेतकरी आहेत जे काही खास पद्धतीने शेती करून अनोखी कामगिरी बजावतात. त्यातून त्यांना खूप पैसेही मिळतात. आज आपण ज्या शेतकऱ्याविषयी बोलणार आहोत, त्यानेही असेच काही केले आहे.
खास बाब म्हणजे हे शेतकरी पहिले पोलिस होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या मनात शेती करण्याचा विचार आला. त्यांनी आपल्या शेतात बटाटे पिकवले.
परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याने त्याच्या शेतातून वार्षिक कमाई 3.3 कोटी रुपये केली आहे. गुजरातमधील डांगिया या छोट्याश्या गावातील पार्थिभाई जेठाभाई चौधरी यांची ही कहाणी आहे. आज देशातील सर्वात मोठ्या बटाटा उत्पादकांपैकी हा एक गणला जातो.
विश्वविक्रम केला :- वन इंडियाच्या अहवालानुसार वार्षिक 3.3 कोटी रुपयांची उलाढाल करण्याबरोबरच गुजरात पोलिस मधील माजी डीएसपी पार्थीभाई यांनी बटाटा उत्पादनात जागतिक विक्रम नोंदविला आहे.
पार्थीभाईंनी पोलिस विभागात एसआय म्हणून सुरुवात केली आणि अखेर 2015 मध्ये डीएसपी म्हणून निवृत्त झाले. त्याला इतर 4 भाऊ आहेत. पार्थीभाईंचे वडीलही शेतकरी होते. भावांमध्ये जमीन विभागल्यानंतर त्यांनी शेती करण्याचा विचार केला.
प्रोग्रेसिव पद्धत वापरली :- पार्थीभाईंनी साध्या शेतीपेक्षा प्रगतीशील दृष्टीकोन स्वीकारला. यासाठी त्यांनी राज्यातील इतर प्रगतशील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून शेतीच्या आधुनिक पद्धती जाणून घेतल्या.
अखेरीस, त्यांनी बटाटे करण्याचा विचार फायनल केला. त्यांनी 2004 मध्ये बटाट्याची शेती करण्यास सुरवात केली. सुरुवातीला त्यांचे काम 5 एकरांवर मर्यादित होते. परंतु हळूहळू त्यांनी जमीन वाढविली जी आज 87 एकरांवर गेली आहे.
तंत्रज्ञानामध्ये त्यांना बरेच ज्ञान मिळाले. आज परिस्थिती अशी आहे की देशभरामधील शेतकरी एका माजी पोलिसाकडून शेतीच्या नवीन पद्धती शिकण्यासाठी येतात.
कोण बटाटे खरेदी करतो ? :- बनासकांठा जिल्ह्यात बरीच मोठी कंपन्या बटाटे खरेदी करतात, त्यात मॅकेन फूड्स इंडिया युनिट, हायफन फूड युनिट आणि बालाजी वेफर्स राजकोट यांचा समावेश आहे.
या बटाट्यांचा वापर चिप्स इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. येथे अन्नासाठी वापरले जाणारे बटाटे देखील येथे पिकविले जातात जे टेबल क्वालिटी नावाने प्रसिद्ध आहेत. पार्थीभाईंनी बटाट्याच्या चांगल्या लागवडीसाठी नायट्रोजन, पोटॅश आणि इतर कीटकनाशकांचे संपूर्ण ज्ञान घेतले आहे.
2.70 कोटी रुपयांचा नफा :- आता पार्थीभाई प्रति एकर 15 ते 17 टन बटाटे पिकवू शकतात. त्यांचा बटाटा 22 रुपये किलो दराने विकला जातो. पार्थीभाईंचे वार्षिक उत्पादन 15 लाख किलो आहे.
या अर्थाने त्यांची वार्षिक उलाढाल 3.3 कोटी रुपये आहे. शेतीसाठी 50-६० लाख रुपये खर्च येतो. म्हणजेच त्याचा 2.70 कोटी रुपयांचा नफा होतो.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp