२३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार,शिक्षकांना करावे लागणार ‘असे’ काही..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, काही अटींवर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतची शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत.

त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या संबंधित सर्व शिक्षकांची कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना प्रयोगशाळेत सुरू झाल्या आहेत.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आज सकाळपासून गर्दी होती. ही गर्दी पाहून रुग्ण संख्या वाढल्याच्या अफवा समाज माध्यमांवर सुरु होत्या. परंतु जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून या अफवांचे खंडन करण्यात आले.

महत्वाचे म्हणजे या चाचण्या मोफत असणार आहेत. याचा खर्च सरकार उचलणार आहेत. सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर चीचणीची जबाबदारी स्थानिक प्रशासन अर्थात महापालिका आणि जिल्हा परिषदांवर सोपवण्यात आलीय.

आरोग्य विषयक सर्व सूचनांचे आणि खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली गेली आहे. शाळा सॅनिटायझर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे. एक दिवसाआड शाळा वर्ग भरविणे, तसेच कोरोनाबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News