अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने यावर्षी पंढरपूरची आषाढी वारीची परंपरा खंडित झाली.
आता मंदिरे खुली झाली असली तरी दक्षतेचा उपाय म्हणून कार्तिकी वारी स्थगितच ठेवण्यात येणार आहे. या काळात पंढरपूरला पालऱ्या-दिंड्या आणू नयेत,
असा आदेश सरकारने दिला आहे.त्यासोबतच पंढपुरात २२ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून २६ नोव्हेंबरपर्यंत एसटी बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
तर २५ नोव्हेंबरच्या रात्रीच्या १२ वाजल्यापासून २६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत शहर व परिसरातील ५ किलोमीटर अंतरापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी पंढरपूरला कार्तिकी यात्राही भरणार नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved