अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- मुस्लिम विवाहितेस फोनद्वारे तलाक दिल्याबद्दल या महिलेच्या पतीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण अधिनियम 2019 चे कलम 3 व 4 नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. 20/11/2020 रोजी दुपारी 03.20वा चे सुमारास फोनद्वारे तलाक देण्याची घटना घडली आहे.
याबाबतची माहिती अशी की, यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने पती-पत्नी असून फिर्यादी नोकरी करण्याकरिता दुबई येथे होती.
ती दिनांक 14 /11 /2020 रोजी परत आल्यावर तिने पतीच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी फिर्यादीस, ”तू इंडिया मे आ गयी क्या?, इंडिया क्यू आइ?, मेरा तेरे से और बेटी से कुछ रिश्ता नही. मुझे तेरे साथ सबंध नही रखने.
मैने तुझे तलाक दे दिया है,” असे म्हणून फोन बंद करून टाकला व फोनवर ‘तलाक’ शब्द बोलून मुस्लिम महिला विवाह कायदा कलम 3चे उल्लंघन करून कलम 4 प्रमाणे शिक्षेस पात्र असा गुन्हा केला आहे म्हणून गुन्हा दाखल केला आहे,
असे ‘एफआरआय’मध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल एम.आय.शेख पुढील तपास करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved