अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- देशात सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाल्यांनतर कालपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
दरम्यान कोरोनाचे सावट कायम असून, या सावटातच शाळा सुरू झाल्या. शहरासह जिह्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्यास नकार दाखविला, तर विद्यार्थ्यांचाही अल्प प्रतिसाद दिसून आला आहे. जिह्यात 1 हजार 200 शाळा असून, त्यातील 350 शाळा सुरू होतील, असा शिक्षण विभागाचा अंदाज होता.
मात्र, यातीलही अनेक शाळांनी आज नकारघंटा वाजविली. नगर शहरात 79 शाळा असून, 35 शाळांनी मनपाला होकार कळविला होता. शाळा सुरू करण्यापूर्वी वर्गखोल्यांची स्वच्छता, सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर, पालकांचे संमतीपत्र, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना
तपासणी यांसह कोरोना नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी स्वच्छता मोहीम राबविली होती. शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळा व्यवस्थापनाने संमतीपत्र भरून घेतले होते.
विद्यार्थ्यांची वर्गात 20 ते 25 टक्के उपस्थिती दिसून आली. जिह्यात एकूण 1200 शाळा असून, त्यातील 350 शाळा सुरू करण्याचे नियोजन होते. अनेक शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचाही अल्प प्रतिसाद आहे. कर्जत तालुक्यात 18 शाळा सुरू होणार होत्या. मात्र, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण न झाल्याने प्रत्यक्षात दोनच शाळा सुरू झाल्या आहेत
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved