डॉ. विखे येथील नागरिकांचा विमा उतरविणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची कर्जत नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली. डॉ. विखे यांनी त्यांच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघात विमा योजना कर्जत नगरपंचायत मधील सर्व नागरिकांना

आपण स्वतः खर्च करून देत आहोत पुढील काही दिवसांमध्ये डॉ विखे यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करून त्यांचा विमा उतवणार आहे.

याचा सर्व खर्च खासदार डॉ सुजय विखे पाटील व भाजप यांच्या वतीने करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. व दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंबातील व्यक्तीला दोन लाख रुपये सहाय्य मिळवून देण्याची देखील यावेळी त्यांनी जाहीर केले.

कर्जत नगरपंचायत चा या लोकार्पण कार्यक्रमांमध्ये वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस नगरपंचायतीच्या वतीने साजरा करण्यात आला.

यावेळी सुजय विखे यांनी ही घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यक्रमानंतर देखील शहरांमध्ये यांची मोठी चर्चा सुरू होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment