माजी सरपंचाकडून गावठी कट्टा, तलवार, दांडक्यांने मारहाण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जातेगांवमध्ये भाऊबंदकीमधील वाद विकोपाला गेला असून माजी सरपंचांच्या मुलाचे डोके पिस्तुलाच्या बटने डोके फोडणाऱ्या भानुदास पोटघन व त्यांच्या पत्नीला गावठी कटटा, तलवार तसेच लाकडी दांडक्याचा धाक दाखवित मारहाण केल्याचा गुन्हा सुपे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात भानुदास रामचंद्र पोटघन (वय ६६ रा. जातेगांव) यांनी फिर्याद दाखल केली असून माजी सरपंच विठठल भगवंत पोटघन, शांताराम भगवंत पोटघन, ॠषीकेश शांताराम पोटघन,

सतिश सदाशिव ढोरमले व सौरव विठठल पोघटन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता भानुदास पोटघन यांच्या घरासमोर गैर कायद्याची मंडळी जमवून तलवार,

गावठी कट्टा तसेच लाकडी दांडक्याने भानुदास पोटघन व त्यांच्या पत्नीस डोक्यात, पायावर, पाठीवर मारून दुखापत करण्यात आली.

शिविगाळ करून दमदाटी तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. मारहाणीत फिर्यादी भानुदास पोटघन व त्यांची पत्नी लताबाई या जखमी झाल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment