खेळाडूंसाठी क्रीडांगण खुली करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोरोना पार्श्‍वभूमीवर राज्यात मागील मार्च महिन्यापासून जीम, मैदाने बंद होती. शासनाने टप्प्याटप्प्याने राज्यभरातील मैदाने, जीम खुली केली.

पण अहमदनगर जिल्ह्यातील खुल्या मैदानावरील सराव बंद असल्याने खेळाडू हवालदिल झाले आहेत. त्यामुळे इनडोअर खेळासोबतच मैदानी खेळांच्या सरावास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.

खेळ हा विद्यार्थ्यांचा स्थायीभाव आहे. अनेक खेळाडू आपल्या आवडीच्या खेळामध्ये भाग घेतात, तर बहुतांश खेळाडू आवडीच्या खेळामध्ये मैदानावर तासनतास सराव करून क्रीडा स्पर्धेच्या रूपाने आपले नशीब अजमावत असतात. पण गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे हजारो विद्यार्थ्यांना घरात बसण्याची वेळ आली.

मध्यंतरीच्या काळात राज्यभरातील अनेक मैदाने खेळाडूंसाठी खुली करण्यात आली. कोरोना सद्यस्थितीत आटोक्यात आला आहे, तरी देखील नगर जिल्ह्यात मैदाने खुली करण्यास परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. विविध राष्ट्रीय फेडरेशन मार्फत क्रीडा स्पर्धेच्या तारखा डिसेंबर-जानेवारीत जाहीर करण्यात आल्या असल्याने नगर जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंत खेळाडू मैदाने खुली न केल्यास या स्पर्धेपासून मुकण्याची शक्यता आहे.

तसेच रोगप्रतिकारक क्षमता ही व्यायामातून विकसित होत असल्याने लवकरात लवकर मैदाने खुली करावीत अशी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर,

शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुनील जाधव, दिनेश भालेराव, घनश्याम सानप, विजयसिंह मिस्कीन, सचिन काळे, कृष्णा लांडे, गुलजार शेख, अमित चव्हाण, संतोष काळे तसेच जिल्हा अध्यक्ष सुनील गागरे, सचिव शिरीष टेकाडे, नंदकुमार शितोळे, दिव्यांगी लांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment