मोठी बातमी : Amazon वर बंदी ? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ई-कॉमर्स कंपनी Amazon वर दंड लावलेला आहे. अ‍ॅमेझॉनवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर देशाची माहिती न दिल्याने मंत्रालयाने 25,000 रुपये दंड ठोठावला होता.

परंतु कन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने हा अमेझॉनवर लादलेला दंड अपुरा असल्याचे म्हटले आहे. दंड त्यांचे म्हणजे आहे की, दंड वसूल करण्याचा हेतू गुन्हेगारांना त्यांची चूक लक्षात आणून देणे आहे, जेणेकरून ते पुन्हा असे करण्यापासून परावृत्त होऊ शकतात, असे कॅटने नमूद केले आहे. कॅट म्हणाले की, सरकारने अशा कंपन्यांविरूद्ध कठोर कारवाई करावी.

अमेझॉन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सात दिवस बंदी घालण्यात यावी. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, नाममात्र दंड लावणे ही न्यायालयीन व्यवस्था आणि प्रशासनाची चेष्टा आहे. अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीनुसार दंड किंवा शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी कॅटने केली आहे.

दुसऱ्यांदा चुकी केल्यास 15 दिवसाची बंदी :- भरतीया आणि खंडेलवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी देण्यासाठी उत्पादनांवर मूळ देशाची माहिती दिली जाणे आवश्यक आहे, परंतु ई-कॉमर्स कंपन्या सतत नियमांचे आणि कायद्याचे उल्लंघन करताना दिसतात.

या कंपन्यांनी केलेल्या पहिल्या चुकांवर सात दिवस आणि दुसरी चूक झाल्यास 15 दिवसांची बंदी घालण्यात यावी अशी मागणी कॅटने केली आहे. कॅटने असेही म्हटले आहे की केंद्र सरकारने अशा तरतुदींच्या अंतर्गत अशा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपन्यांना दंड आकारला.

कॅटने म्हटले आहे की Amazon सारख्या मोठ्या जागतिक ई-कॉमर्स कंपनीला 25000 रुपये दंड म्हणजे ही खूपच मामुली रक्कम आहे. जर शिक्षेची रक्कम किंवा शिक्षेची तरतूद कठोर असेल तर या कंपन्या नियमांचे उल्लंघन करण्यापूर्वी बर्‍याच वेळा विचार करतील.

भरतिया आणि खंडेलवाल यांनी 25 हजार रुपयांचा दंड कायद्याशी तडजोड असल्याची माहिती दिली आणि म्हणाले की कायदा प्रत्येकासाठी समान असावा. त्याच प्राण त्यांनी फ्लिपकार्ट आणि मिंत्रासारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसाठीही हा नियम समान रूपात लागू करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment