पाणी प्रश्नाबत सभापती मनोज कोतकरांनी दिले हे आदेश

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-अमृत पाणी योजनेची ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सभापती मनोज कोतकर यांनी आज आढावा घेतला आहे.

नगर शहरात पाण्याची अडचण निर्माण होतेय म्हणून अमृत पाणी योजनेची मुळा धरणापासून विवाद पंपिंग स्टेशन पर्यंतची पाहणी करून पाणी पुरवठा विभागाची तातडीची बैठक घेऊन या योजनेला गती देऊन मार्च अखेर पर्यंत ती पूर्णत्वास नेण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी दिले.

स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी घेतलेल्या अमृत पाणी योजनेच्या बैठकीत पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, सोनन इंजिनिअरींग चे संचालक पानसे, अभियंता गणेश गाडळकर, पीएमसीचे मुळे आदी उपस्थित होते. यावेळी दुसर्‍यांदा शेतकर्‍यांची पिकांचे पंचनामे करून

त्यांना धनादेश द्यावा व त्यांच्या शेतातून लवकरात लवकर पाईप टाकण्याचे काम सुरू करावे. तसेच वनविभागाच्या जागेतून पाईप लाईन जात आहे. जिल्हा वन अधिकारी रेड्डी यांची भेट घेवून परवानगी घ्यावी. मुळा धरण येथील पंपींग स्टेशनचे काम मार्गी लावावे यासाठी प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरूवात करावी असा आदेश या बैठकीत देण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News