‘त्या’ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना अलीकडेच फोन करून न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलीस व्यापाऱ्यांच्या घरात घुसतातच कसे? असा प्रश्न विचारला आहे.

वाद एवढ्यावरच थांबला नाही तर लोणीकरांनी चक्क आयपीएस अधिकाऱ्यांना विधानसभेत उलटे टांगण्याची धमकी दिली.याबाबतचा एक कथित ऑडिओ अलीकडेच सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

क्लिपमध्ये बबनराव लोणीकर परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांच्याशी फोनवर बोलत असल्याचे जाणवत आहे. प्रकरण असे की, आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना तीन दिवसांपूर्वी परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची टीप मिळाल्यानंतर पथकासह त्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला होता;

पण त्यांना छापेमारीत काहीच आढळून आले नाही. यानंतर संबंधित व्यापाऱ्याने घडलेला प्रसंग लोणीकर यांना सांगितला. यामुळे लोणीकर संतापले आणि त्यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचे सांगण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment