न्यूयॉर्क : आजपासून सुमारे २६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला सामूहिक विनाशाला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान संपूर्ण पृथ्वीवरून जीवजंतू गायब झाले होते आणि यासोबतच भूगर्भीय आणि बाह्य कारणांमुळे पृथ्वीवर सामूहिक विनाशाच्या घटनांची संख्या सहावर पोहोचली होती.
एका ताज्या अध्ययनातून शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक मिशेल रेम्पिनो यांनी सांगितले की, सामूहिक विनाशाच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर आतापर्यंत कितीवेळा अशा विनाशाला सामोरी गेली आहे, हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
रेम्पिनो यांनी सांगितले की, याआधीच्या अध्ययनांतून असे लक्षात येते की, सामूहिक विनाशाच्या सगळ्या घटना पर्यावरणीय उलथापालथीमुळे झाल्या होत्या. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर पूर व ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना घडल्या होत्या.
यामुळे पृथ्वीवर लाखो किलोमीटरपर्यंत लाव्हा पसरला होता. परिणामी पृथ्वी जीवजंतूविहीन झाली होती. याआधी शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की, पृथ्वीवर आतापर्यंत पाचवेळा सामूहिक विनाशाच्या घटना झाल्या आहेत.
त्यामुळे मोठ्या संख्येने अनेक जीवांच्या प्रजाती नष्ट झाल्या. भूशास्त्रज्ञांनी सामूहिक विनाशाच्या कालखंडाचे ऑर्डोविनशियन (४४.३ कोटी वर्षांपूर्वी), लेट डेवोनियन (३७ कोटी वर्षांपूर्वी), पर्मियन (२५.२ कोटी वर्षांपूर्वी), ट्रायसिक (२०.१ कोटी वर्षांपूर्वी) व क्रेटेशियस (६.६ कोटी वर्षांपूर्वी)असे वर्गिकरण केले आहे.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, आजी अनेक प्रजाती विलुप्त होण्याच्या उंबरठ्यावर असून पृथ्वीचे तापमानही सातत्याने वाढत आहे. समजा ही प्रक्रिया थांबली नाही तर लवकरच आपल्या सातव्या सामूहिक विनाशाचे साक्षीदार व्हावे लागेल.
- Tata Sierra 2025 : टाटा मोटर्सची धमाल ! Tata Sierra EV सादर, किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट जाणून घ्या
- लग्न जुळेना, बाहेर जाण्यास बंदी, पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत ! टक्कल पडलेल्या लोकांचे काय हाल होत आहेत ?
- Tata Power Share: टाटा पॉवर कंपनी शेअरने दिला 3517% चा परतावा! प्रसिद्ध ब्रोकिंग फर्मने दिली टार्गेट प्राईस
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे मेट्रोच्या वेळेत झाला मोठा बदल
- Motilal Oswal Mutual Fund : एक लाखाचे केले तब्बल सहा लाख रुपये ! नोकरदार असाल तर आजच करा गुंतवणूक