अबब ! लाखो मधमाश्यांनी केला विमानावर हल्ला आणि मग झाले ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-मधमाश्यांनी विमानावर हल्ला केलाय असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटेल ? पण तसे झाले आहे. टीओआयच्या म्हणण्यानुसार कोलकातामधील विस्तारा एअरलाइन्सच्या दोन विमानांमध्ये असे घडले आहे. या विमानांवर लाखों मधमाश्या येऊन बसल्या. मधमाश्यांनीही खिडक्या संपूर्ण झाकून टाकल्या.

एक तास उशिरा उड्डाण केले

एअरलाइन्सशी संबंधित प्रवक्त्याने सांगितले की रविवारी संध्याकाळी आणि सोमवारी सकाळी या घटना घडल्या. तथापि, एअरलाइन्सने एयरपोर्ट ऑपरेटरकडून स्वतंत्र ‘बे’ मागितली होती. विमानावर बर्‍याच मधमाश्या आल्या होत्या त्यांना काढण्यासाठी बराच वेळ लागला.

वॉटर जेट फवारले

लाखो मधमाश्या विमानावर बसल्या होत्या. त्यानंतर त्यांना काढून टाकण्यासाठी वॉटर जेट स्प्रे केले गेले. सायंकाळी साडेपाच वाजता निघालेल्या विमानाने साडेसहा वाजता उड्डाण केले.

दुसर्‍या दिवशी पुन्हा धक्का बसला

दुसर्‍याच दिवशी विस्ताराच्या ग्राऊंड स्टाफला मोठा धक्का बसला. त्यानी पहिले की, मधमाश्या पुन्हा विस्तारा च्याच विमानावर बसल्या आहेत. हे विमान पोर्ट ब्लेअरला जाणार होते. वेळ 10:30 ची होती. पुन्हा वॉटर जेटची मदत घेण्यात आली.

हे विमान 11:30 वाजता टेकऑफ झाले. काही वैमानिकांनी मधमाश्या काढल्याशिवाय वैमानिक विमान उड्डाण करू शकत नसल्यचे सांगितले कारण या प्रकरणात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता असते.

कोठेही मधमाशांचे पोळे दिसले नाही 

कोलकाता एयरपोर्ट डायरेक्टर कौशिक भट्टाचार्य म्हणाले की, अशा घटना सतत वाढत आहेत. त्यांनी सांगितले की एयरपोर्ट ग्राउंड आणि टर्मिनल बिल्डिंग चेक केले जात आहे की तेथे मधमाश्यांनी पोळे आहे काय याविषयी. अद्याप कोठेही पोळे सापडले नाहीत. असे म्हटले जात आहे की, या स्थलांतरित मधमाश्या असू शकतील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment