अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण’ या विषयावर ऊर्जा, नगरविकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत नवीन ऊर्जा कृषी धोरणाची गरज, नवीन कृषीपंप वीज जोडणीच्या धोरणात दरवर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज जोडणी, वीजबिल वसुलीसाठी घेण्यात येणारे सहाय्य,
शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन, अपारंपारिक ऊर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना राबविणार आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. तनपुरे यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved