कत्तलखाने सुरु करण्यासाठी हालचाली सुरु; पुढाऱ्यांचा हातभार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-राज्यात गोहत्त्या बंदी कायदा असताना संगमनेरात मात्र दररोज अनेक जनावरांची कत्तल सुरू होती. शहरातून दररोज सुमारे 10 हजार किलो मांस मुंबई, ठाणे शहरांमध्ये जात होते.

मात्र गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने पुन्हा सुरू करण्यासाठी कत्तलखानाचालकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

तसेच कत्तलखाना चालकांनी थेट राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजकीय पदाधिकार्‍यांच्या गाठी-भेटी घेऊन कत्तलखाने पुन्हा सुरू करावते यासाठी या पदाधिकार्‍यांना साकडे टाकले जात आहे. दरम्यान संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड, जमजम कॉलनी, भारतनगर आदी ठिकाणी अनेक बेकायदेशीर कत्तलखाने सुरू होते.

मुंबईसह परराज्यात संगमनेरातील मांस निर्यात होते. कत्तलखाना व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अनेकजण या व्यवसायात उतरले आहेत. पोलिसांनी शेकडो वेळा कारवाया करूनही हे कत्तलखाने पुन्हा नव्या जोमाने सुरू होत होते. यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबतच शंका उपस्थित केली जात होती.

पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पदभार स्विकारताच शहरातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. सर्व कत्तलखाने त्यांनी बंद केले. मात्र आता कत्तलखाने सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आपल्या सहकारी कर्मचार्‍यांना कत्तलखान्यांकडे लक्ष देण्याचे सक्त आदेश दिले आहेत. यामुळे भविष्यात पुन्हा एकदा हे कत्तलखाने पुन्हा सुरु होणार कि बंद याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment