अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे अनेक जणांना दर्शन झाल्याने दहशत पसरली आहे.
चार दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खंडेश्वर वाडीत बिबट्याचे दर्शन झाले. दोन दिवसांपूर्वी सकाळी कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या
काही महिलांच्या निदर्शनास पिल्ले व मादी आली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संजय भुजबळ हे शेतात काम करत असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved