अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर समस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काही वेळेसाठी लिलाव बंद करून
घोषणाबाजी करत निर्यात बंदीचा निषेध नोंदवला.सध्या कांदा निर्यात बंद असल्याने कांद्याचे भाव घसरले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
त्याकरीता केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी खुली करावी व कांदा साठवणूक मर्यादेची अट शिथिल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी जोरदार मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या वेळी केली.
या वेळी कांदा उत्पादक शेतकरी सचिन होळकर यांनी निषेध व्यक्त करतांना सांगितले की,कांदा निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर दिवसागणिक खाली येत आहे.ही सर्व परिस्थिती पाहता आगामी काळात कांद्याची आवक वाढल्यास बाजार भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे.
सरकारने ज्याप्रमाणे जीएसटी नोटबंदीचा निर्णय तातडीने घेतला तसा निर्णय कांद्याची निर्यातबंदी उठून तत्परता दाखवावी.या हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला असल्याने केंद्र सरकारने तातडीने कांद्याची निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे होळकर यांनी सांगितले.
या वेळी सचिन होळकर,बबन शिंदे,धर्मेश जाधव,ज्ञानेश्वर पाटील,संदीप उगले,महेंद्र हांडगे,सुरेश कुमावत,राजेंद्र जाधव,राजेंद्र कराड,राजेंद्र होळकर,प्रमोद पाटील तसेच मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved