अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- बी.एम.एस.झालेल्या आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांना 58 अॅलोपॅथीक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध खासगी डॉक्टरांनी केला आहे.
दरम्यान ही परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या शुक्रवारी (11 डिसेंबर) संप पुकारला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशानने आंदोलनाचे नियोजन केले असून,11 डिसेंबरला भारतातील सर्व दवाखाने, क्लिनिक व ओपीडीच्या सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत.
सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या संपाचे आयोजन केले गेले आहे. या आधिसूचनेचे दुष्परिणाम संबंधित रुग्णांच्या आयुष्यावर व पर्यायाने आरोग्यावर होणार आहे. यासाठी जनजागृतीपर आयएमएच्या सर्व शाखांच्यावतीने देशभरात करण्यात येत आहे.
शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनामध्ये शासकीय व खासगी महाविद्यालयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. तसेच आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्व स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिटी शाखा, शासकीय डॉक्टरांच्या संघटना, मेडिकल कॉलेजमधील शिक्षक संघटना यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- काय सांगता! आ.लंके यांच्या मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांचा मतदार यादीत समावेश
- रेखा जरे यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच संशयास्पद अपघातात एकाचा मृत्यू
- प्रेरणादायी ! ‘ती’चे अफाट कर्तृत्व; नोकरी सोडून केला ‘हा’ व्यवसाय, आता कमावतेय 30 लाख