चिंताजनक : गूढ आजारामुळे एकाचा मृत्यू,तब्बल ५०० जण आजारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- आंध्र प्रदेशातील एलुरूमधील गूढ आजारामागे प्रदूषित पाणी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ५०० हून जास्त लाेक आजारी पडले आहेत.

एम्स, राज्य, केंद्रीय संस्थांमधील तज्ज्ञ तसेच आराेग्य अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार पिण्याचे पाणी तसेच दूध यामध्ये लीड तसेच इतर धातूंचे जास्त प्रमाण आढळून आले आहे.

यासंबंधीचा अहवाल मंगळवारी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमाेहन रेड्डी यांना साेपवण्यात आला आहे. सध्या भारतीय रासायनिक आैद्याेगिक संस्थेद्वारे त्याचे परीक्षण केले जात आहे.

त्याचा अहवाल अद्याप बाकी आहे. त्यानंतर वास्तविक कारण स्पष्ट हाेईल. या आजारामुळे चक्कर येणे, डाेकेदुखी किंवा अचानक बेशुद्ध हाेण्याच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत.

त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. दुसऱ्या दिवशी रविवारी ही संख्या ३०० वर पाेहाेचली आहे.

आतापर्यंत ५०५ लाेक आजारी पडले आहेत. त्यापैकी ३७० बरे झाले आहेत. १२० लाेकांवर उपचार सुरू आहेत. १९ जणांना विजयवाडा व गुंटूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment