जामखेड: जामखेड तालूक्यातील अर्धी राष्ट्रवादी भाजपात येण्याच्या मार्गावर असुन येत्या 15 दिवसात तालुक्यातील अनेक बडे नेते भाजपात आणणार असल्याचे पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरुमकर यांनी स्पष्ट केले. तसेच मी भाजपातच असुन ना राम शिंदे यांचेच काम करणार आहे, मुरुमकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपातुन राष्ट्रवादीमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान अनेक भाजपातील नेत्याबद्दल अफवा पसरल्या होत्या यामध्ये विद्यामान पंचायत समिती सदस्य भगवान मुरुमकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याचे अफवा पसरली होती. आज भगवान मुरुमकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण भाजपमध्येचं असल्याचे स्पष्ट केले.

मुरुमकर म्हणाले, मी भाजपातच असुन आगामी काळातही मंत्री राम शिंदे यांचेच काम करणार आहे. विरोधकांच्य्या पायाखालची वाळू सरकली असल्याने भाजपच्या नेत्याबद्दल अफवा पसरल्या जात आहे. मंत्री राम शिंदे यांनी कर्जत जामखेड तालुक्यात भरघोस विकास कामे सुरू आहेत. एकही भाजपाचा नेता व कार्यकर्ता राष्ट्रवादीत जाणार नाही, असे मुरुमकर यांनी स्पष्ट केले
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, सारोळाचे संरपच अजय काशीद, शिऊरचे संरपच हनुमंत उतेकर, मनोज कुलकर्णी, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, रत्नापूरचे संरपच दादासाहेब वारे, सोमनाथ राळेभात, काशीनाथ ओमासे, विलास मोरे, पांडुरंग उबाळे, प्रवीण चोरडिया, शरद कार्ले, नगरसेवक महेश निमोणकर, संतोष गव्हाळे उपस्थित होते.
- मोबाईल व सोशल मिडीयाच्या आहारी न जाता तरूणांनी खेळाकडे लक्ष द्यावे- आमदार मोनिका राजळे
- Share Market मधून खोऱ्याने पैसे कमवायचे ? मग ‘हे’ 5 Stock खरेदी करा, ब्रोकरेज फर्मने दिलीये बाय रेटिंग
- कर्जत तालुक्यात श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा ४ ऑगस्टला होणार संपन्न, जोरदारी तयारी
- नागपंचमीनिमित्त जामखेडमध्ये रंगला कुस्त्यांचा थरार, अतीतटीच्या लढतीत पै.कालीचरण सोनवलकर यानी पटकावली मानाची गदा
- भिंगार शहरातून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस आता भिंगारमध्ये थांबणार, परिवहन अधिकाऱ्यांचे निर्देश