इंदोरीकर महाराजांची सुनावणी ‘ह्या’ तारखेला होणार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या विधानावरुन वादग्रस्त ठरलेले निवृत्ती महाराज (इंदोरीकर) यांच्यावरील खटल्याची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १६ डिसेंबरला ठेवली आहे.

मंगळवारी होणारी सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली होती. सरकारी वकिलांनी कनिष्ठ न्यायालयाकडील दाव्यातील कागदपत्र व संपूर्ण फाईल या न्यायालयात सादर करण्यासंदर्भात अर्ज केला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या वकिलांना प्रमाणित नकला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe