अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राज्य शासनामार्फत जानेवारीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे.
खासगी आरोग्य सेवतील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
कोव्हिड-१९ लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हा कृतीदल समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात झाली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, नोडल अधिकारी डॉ. फारूख देसाई आदी उपस्थित होते. नोडल अधिकारी डॉ. देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली.
यामध्ये लाभार्थ्यांची नोंदणी, लसीकरण पथकाचे प्रशिक्षण, लसीसाठी शीतसाखळी केंद्रे याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ५ लाख ५७ हजार १७६ लाभार्थी पहिल्या टप्प्यासाठी आहेत. जिल्ह्यात एकूण १२२ शीतसाखळी केंद्रे आहेत. डॉ. साळे म्हणाले, लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे.
पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखन्यातील आरोग्य सेवक, कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृतीदल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये