अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे आहे. नामदेव राऊत यांचा हा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून एसएनआर लघू व मध्यम उद्योग विकास समूहाच्या माध्यमातून ‘आपले गाव, आपला रोजगार’ या संकल्पनेचा प्रारंभ करण्यात आला.
घरबसल्या रोजगार मिळवण्यासाठी महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण देऊन कच्च्या मालाचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. विखे बोलत होते. नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत,
भामाबाई राऊत, नगरसेविका उषा राऊत, राखी शहा, हर्षदा काळदाते, नीता कचरे, राणी गदादे, आशा वाघ, डॉ. कांचन खेत्रे, वैभव शहा, अमृत काळदाते, रिपाइंचे संजय भैलुमे आदी यावेळी उपस्थित होत्या.
खासदार विखे म्हणाले, महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. महिलांना कुटुंब हाकताना होणारी कसरत या आर्थिक हातभाराने सुलभ होणार आहे. यावेळी महिला प्रशिक्षिका सुनीता हिरडे आणि तब्बसुम शेख यांनीही मार्गदर्शन केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये