अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलिस निरिक्षकांच्या बदल्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील चार पोलिस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सुपा, शिर्डी वाहतूक शाखा व नियंत्रण कक्षातील पोलिस निरिक्षकांचा समावेश आहे.

तर शेवगाव पोलिस ठाण्याला पोलिस निरिक्षक मिळाले असून प्रभारी कारभार संपुष्ठात आला आहे. आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील चार पोलिस निरिक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले.

या आदेशाने शेवगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक म्हणुन नियंत्रण कक्षाचे पोनि. प्रभाकर भाऊराव पाटील यांची विनंतीने बदली करण्यात आली आहे.

तसेच सुपा पोलिस ठाण्याचे पोनि. राजेंद्र भोसले यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून त्यांच्या जागी शिर्डी वाहतूक शाखेचे पोनि.

नितीनकुमार गोकावे यांची बदली करण्यात आली आहे. तर शिर्डी वाहतूक शाखेला नियंत्रण कक्षाचे पोनि. नारायण न्याहळदे यांची बदली करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe