द डर्टी पिक्चरमधील अभिनेत्रीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-द डर्टी पिक्चरमधील अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी म्हणजेच आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झालाय.कोलकातामधील जोधपूर पार्कमधील तिच्या राहत्या घरी देवदत्त मृतावस्थेत सापडली.

अनेकदा दार वाजवूनही आतून काही न उत्तर आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलवलं. अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते.

पण त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही दुखापत झाली नव्हती. देवदत्तला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

देवदत्तच्या मृत्यूच कारण आद्यप अस्पष्ट आहे. देवदत्तचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कोलकातामध्ये जन्मलेल्या देवदत्तने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘द डर्टी पिक्चर’मध्येही काम केलं होतं. देवदत्त ही प्रसिद्ध सितारवादक दिवंगत पंडित निखिल बॅनर्जी यांची कन्या होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment