मोदी म्हणाले ”कोरोना काळात नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं” !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील. शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहेत.

यामुळे देशात कोल्ड स्टोरेज इंफ्रास्ट्रक्चर आधुनिक होणार आहे. परिणामी कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायद्यांचे पुन्हा एकदा समर्थन करत ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आज फिक्कीच्या ९३व्या वार्षिक आमसभा आणि वार्षिक संमेलनाला संबोधित केले.

२०२० वर्षानेही सर्वांवर मात केली :- मोदी पुढे म्हणाले की, आपण २०-२० सामन्यांमध्ये खूप काही वेगाने बदलताना पाहिलं आहे. २०२० वर्षानेही सर्वांवर मात केली आहे. जग आणि देशात एवढे चढउतार या वर्षात पाहायला मिळाले. काही वर्षांनंतर आपण जेव्हा कोरोना काळाबाबत विचार करू त्यावेळी आपल्यालाही विश्वास बसणार नाही, अशा गोष्टी घडल्या आहेत. मात्र चांगली गोष्ट ही आहे की, जेवढ्या वेगाने परिस्थिती बिघडली तेवढ्याच वेगाने स्थिती सुधारत देखील आहे.

कोरोना काळात नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं :- मोदी म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात भारताने आपल्या नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवले. देशाचं उदाहरण देशासह जग पाहात आहे. भारताने मागील काही महिन्यांपासून एकत्रित येत जे काम केलं आहे. धोरणं आखली आहेत, निर्णय घेतले आहेत, परिस्थिती सावरली आहे, हे पाहून जग आश्चर्यचकित झालं आहे, असं मोदी म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment