अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- कॅन्सरला सुरवातीच्या स्टेजमध्येच ओळखणा-या व त्याच निदान करणा-या यंत्रांची निर्मिती आवश्यक असून कॅन्सर प्रतिबंध या क्षेत्रात दिवसेंदिवस संशोधन आणि नव निदान पद्धतींची निर्मिती करणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपुरातील मानेवाडा रिंगरोड वरील राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे ‘न्यू इलेक्ट्रा वर्सा एचडी’ लिनियर एक्सिलेटर या अत्याधुनिक यंत्राचे शनिवारी गडकरी याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन विकास मंत्री सुनिल केदार, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्रात जेवढी यंत्रसामुग्री आहेत
त्याच्या हाताळणीसाठी एम.एस.एम.ई. मार्फत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबावावेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळतील आणि केंद्रालाही लाभ होइल, असे गडकरींनी यावेळी सुचविले. या केंद्राचे अधिकारी आणि भागदारकांच्या खूप वाटाघाटी नंतर लिनियर एक्सिलेटरसारख्या अत्याधुनिक मशीन स्थापण्यास या केंद्रामध्ये मंजुरी मिळाली . या केंद्राला वेळोवेळी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे अधिक अर्थसहाय्य मिळणार असून काळानुरूप मशीन मध्ये गुणवत्तापुर्ण सुधारणा होणार आहेत, असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
मध्यप्रदेश छत्तीसगड या राज्यातील नागरिकांना या केंद्राने खूप मदत केली. सामाजिक सेवा देणारी अत्याधुनिक यंत्रणा समाजाला देवून या केंद्राने आपली जबाबदारी पार पाडली , असेही त्यांनी नमुद केले,. येणाऱ्या काळात या केंद्रात अजून नवनवीन उपकरणे येथे येतील अशी अपेक्षा करतो . येथील वास्तूचे बांधकाम खूप चांगले झालेले आहे . तुकडोजी महाराजाचा कॅन्सर मूळे मृत्यू झाला होता आणि या केंद्राची स्थापना त्यांना वाहिलेली एक अमूल्य श्रद्धांजली आहे , असे मत याप्रसंगी गडकरी यांनी यावेळी मांडले.
‘लिनियर एक्सिलेटर’ या मशीनद्वारे कर्करोगाच्या अतिसूक्ष्म गाठी शोधता येणार असून यामुळे मेंदू आणि मुख तसेच इतर संबंधित अवयवायांच्या कर्करोगाचे निदान कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सोप्या पद्धतीने होणार आहे, अशी माहिती या रुग्णालयाच्या रेडीओलॉजी विभागाचे डॉ.करतार सिंग यांनी दिली. याप्रसंगी कार्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबीलीटी अंतर्गत जेएनपीटी कडून मिळालेला धनादेशाही नितीन गडकरी, राज्याचे पशुसंवर्धन विकास मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते केंद्राला सुपुर्द करण्यात आला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये