अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- भारतामधील 70 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांसाठी एक वाईट बातमी आहे. खरं तर, 70 लाख भारतीय क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांचा डेटा लीक झाला होता.
या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांशी संबंधित संवेदनशील डेटा डार्क वेबद्वारे ऑनलाइन समोर आला आहे. या डेटामध्ये फक्त कार्डधारकांचे नावच नाही तर मोबाइल नंबर, उत्पन्नाची पातळी, ईमेल पत्ता आणि पॅन नंबर देखील आहे.
हे Google ड्राइव्ह लिंकद्वारे डाउनलोड करण्यासाठी देखील उपलब्ध आहे. हि लिंक पब्लिक एक्सेससाठी खुला आहे आणि काही दिवसांसाठी डार्क वेबवर उपलब्ध आहे.
साइबरसिक्योरिटी रिसर्चरला मिळाली लिंक :- गॅझेट्स 360 च्या अहवालानुसार एका साइबसिक्योरिटी रिसर्चरला या महिन्याच्या सुरूवातीस डार्क वेब वरून या गूगल ड्राइव्हची लिंक मिळाली आहे. हे “क्रेडिट कार्ड होल्डर्स डेटा” टाइटल सह सर्कुलेशन मध्ये होते. लिंकमध्ये 59 एक्सेल फायली आहेत ज्यात पूर्ण नावे, मोबाइल नंबर, शहरे, उत्पन्नाचे स्तर आणि कार्डधारकांचे ईमेल पत्ते समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त पॅन कार्ड नंबर, एम्प्लोयर डिटेल आणि प्रभावित क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांचा बॅंकेच्या खात्याचा प्रकार समावेश आहे. तथापि लीक झालेल्या डेटामध्ये कार्डधारकांची बँक खाती आणि कार्ड क्रमांक समाविष्ट नाहीत.
रिसर्चर डिटेल समाविष्ट :- हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ज्या संशोधकाला हि लिंक मिळाली त्याचा वैयक्तिक डेटादेखील लीक झालेल्या डेटामध्ये सामील होता. त्यांनी लिंक्डइनवर शोधून किंवा कॉलर आयडी अॅप Truecallerवर मोबाइल नंबर सर्फिंग करून एक्सेल फायलींमध्ये सूचीबद्ध केलेली काही नावे देखील ओळखली. ज्या कार्डधारकांचे तपशील लीक झाले आहेत त्यांच्या बँकांचा कोणताही स्पष्ट संदर्भ नसला तरी, या डेटामध्ये बहुतेक कार्डधारकांच्या प्रथम स्वाइप रकमेचा समावेश आहे. कार्डधारकांनी त्यांच्या मोबाईलवरील अलर्ट चालू केली आहे का नाही हे लीक केलेल्या डेटामध्येही समाविष्ट आहे.
थर्ड पार्टीशी कनेक्ट असू शकतो डेटा :- हा डेटा मिळालेल्या संशोधकाचे म्हणणे आहे की हा डेटा बँकांना सेवा देणार्या एखाद्या थर्ड पार्टीशी लिंक असू शकतो. डेटा कोणत्या कालावधीचा लीक झाला हे स्पष्ट झाले नाही. तथापि, बहुतेक तपशील 2010 ते 2019 दरम्यानची असण्याची शक्यता आहे. काही प्रकरणांमध्ये, 2004 पर्यंत कार्डधारकांची माहिती देखील समाविष्ट केली गेली आहे. हा डेटा आर्थिक उत्पादनांशी संबंधित आहे आणि मुख्यतः व्यावसायिकांचा आहे.
पंतप्रधान मोदींचा डेटादेखील लीक झाला आहे :- ही घटना प्रथमच घडली आहे असे नाही. ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटवरील डेटा डार्क वेबवर आला होता. डेटा लीकमध्ये लाखो व्यक्तींची नावे, ईमेल पत्ते आणि मोबाइल नंबरचा समावेश आहे. मागील वर्षी सायबर गुन्हेगारांनी 1.3 मिलियन हून अधिक भारतीय बँकिंग ग्राहकांच्या डेबिट व क्रेडिट कार्ड डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवला होता.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com