अशा समंजस गावांसाठी विकास निधी कमी पडू देणार नाही : आमदार लहू कानडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड केल्यास गावातील प्रेम व सौहार्द टिकू शकते. त्याचा परिणाम शासनाच्या विविध योजना एकजुटीने राबवण्यासाठी होतो.

अशा समंजस गावांसाठी विकास निधी कमी पडू देणार नाही, असे आमदार लहू कानडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

निवडणुकांचे आजचे स्वरुप स्पर्धात्मक न राहाता युध्दजन्य बनले आहे. अनेक पक्ष व गट, ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त आपले वर्चस्व गावावर रहावे म्हणून काही कारभाऱ्यांना आपलेसे करुन स्वत:च्या गटाची पार्टी तयार करुन लोकांना झुंजवतात.

एकाच गावचे गावकरी अनेक गटा-तटांमध्ये दुंभगले जातात. निवडून येण्याच्या इर्षेने एकमेकांशी शाब्दिक चकमकी होतात. काही हाणामारीचे प्रसंगही उद्भवतात. हे सर्व टाळावयाचे असल्यास ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्या, अशी अपेक्षा आमदार कानडे यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment