अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- आपण अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांच्या कथा ऐकल्या असतील कि ज्यांनी त्याही परिस्थितीवर मात करत आपले जीवन यशस्वी बनवले. आजही आपण अशीच एक प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत. आजची कहाणी आहे सुनील वशिष्ठ यांची.
सुनील वशिष्ठ दहावी उत्तीर्ण झाले होते, तेव्हा त्याचे पालक म्हणाले होते, “मुला, आता पुढील शिक्षण तू तुझे बघ. ” सुनीलने इकडे तिकडे काम शोधण्यास सुरवात केली पण काही काम सापडले नाही. जिथे जाल तिथे उत्तर मिळायचे , ‘तुम्ही 18 वर्षांचे नाही, म्हणून तुम्ही काम देऊ शकत नाही.’
दरम्यान, दूध कंपनीत दूध वाटप करण्याचे काम सुनीलला मिळाले. मासिक वेतन दोनशे रुपये होते. या कमाईमुळे त्याने अकरावी-बारावीचे वर्ष पूर्ण केले.
जेव्हा तो कॉलेजला गेला, तेव्हा त्याच्या गरजेबरोबर खर्चही वाढला. म्हणूनच सुनीलने आणखी काही काम शोधण्यास सुरवात केली. लग्नांमध्ये वेटर म्हणून काम सुरु केले. काही साड्यांच्या शोरूममध्ये अर्धवेळ नोकरीसुद्धा केली परंतु मिळकत कमी होती. तो म्हणतो, ‘त्यावेळेस मी एका कुरिअर कंपनीची मुलाखत दिली आणि त्यांनी मला पूर्ण वेळ भरती केले.
मला पूर्णवेळ नोकरी मिळताच माझा अभ्यास सुटला आणि मी जॉबला लागलो. काही वर्षांत सुनीलला या नोकरीचा कंटाळा आला, कारण तेथे प्रमोशन किंवा वेतनवाढ नव्हती. सुनील म्हणतो की, ‘त्या वेळी डॉमिनोज पिझ्झा सुरू झाला आणि प्रत्येकाने त्यात काम करायचं होतं, मीही तिथे गेलो.’
सुनीलने दोनदा मुलाखती दिल्या, पण त्यांची निवड झाली नाही. याचे कारण इंग्रजी होते. मी पुन्हा तिसऱ्यादा परीक्षा देण्यास गेलो असता एचआरने मला बोलावले आणि विचारले की तुला आधीच दोनदा नाकारले गेले आहे आणि मग तू इथे का आलास. यावर सुनील म्हणाला, ‘सर, मला एक संधी द्या, इंग्रजी येण्यातच सर्व काही नसते.’ येथे सुनीलचे सिलेक्शन झाले .
त्याने पाच वर्षात डिलिव्हरी बॉय ते मॅनेजरपर्यंत मजल मारली. पण बॉसशी इश्यू झाल्याने त्याने नोकरी सोडली. त्यानंतर सुनीलने जेएनयूसमोर स्वत: चा फूड स्टॉल सुरू केला. स्वत: काहीही बनवू शकत नसल्याने एक कुक ठेवला. हे काम चांगलेच चालले होते, परंतु आजूबाजूच्या लोकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली. त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेला स्टॉल पाडून टाकला. यानंतर सुनीलने धैर्य गमावले नाही.
काय केले जाऊ शकते याचा विचार करत असताना मित्राने सांगितले की, ‘नवीन कंपन्या नोएडा येथे येत आहेत आणि केकची खूप मागणी आहे, तुम्हाला हवे असल्यास केकचा व्यवसाय सुरू करा.’ सुनीलने नोएडामधील मॉलमध्ये अडीच लाख रुपयांची गुंतवणूक करून केकचा व्यवसाय सुरू केला.
यासाठी पत्नीचे दागिने विकले. मित्राकडून पैसे घेतले आणि आपल्याकडे असलेले सर्व काही त्यात लावले. दीड वर्षापासून नो प्रॉफिट नो लॉसमध्ये व्यवसाय चालू राहिला. मग एक दिवस एक महिला केक घ्यायला आली, तिला टेस्ट खूप आवडली. सुनील म्हणतो, ‘ती एका मोठ्या आयटी कंपनीची एचआर होती. दुसर्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि कंपनीला केक पुरवण्याचा करार केला.
तेव्हाच आमच्या व्यवसायात जी वाढ झाली त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. आज आमच्या 15 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. उलाढाल कोटींमध्ये आहे. 2025 पर्यंत 50 आउटलेट उघडण्याचे उद्दीष्ट आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये