अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. यासर्वा दरम्यान कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी 8 ग्रामपंचायतसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता.
काल दुसर्या दिवशी टाकळी येथे 4, धुमाळवाडी 2, निंब्रळ 1, लहीत बुद्रुक 1, ब्राम्हणवाडा 1, वाशेरे 1, कोतूळ 1 व पांगरी ग्रामपंचायतसाठी 2 अशा प्रकारे 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सध्या राखीव जागांवरील उमेदवार कागदपत्रे गोळा करण्याच्या धावपळीत दिसत आहेत. सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांत धाकधूक निर्माण झालेली पाहावयास मिळाली.
दरम्यान आज नाताळची सुट्टी उद्या शनिवार व परवा रविवार असल्याने आजपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने सोमवार नंतर मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved