अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- नागपुर मध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका कारला ट्रेलरने उडवले. यात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले.
तर एकावर उपचार सुरू आहेत. मिहान परिसरातील खापरी पुलावर हा भीषण अपघात झाला. एका कारला भरधाव ट्रेलरने उडवले.
यात कारमधील चौघे जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. बालचंद उइके, पीयूष टेकाडे, नेहा गजभिये आणि पायल कोचे अशी मृतांची नावे आहेत. तर आशिष सरनायल यांच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे सर्व कर्मचारी एग्जावेअर कंपनीतून काम संपवून कारने घरी परतत होते. त्याचवेळी शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास खापरी पुलावर त्यांच्या कारला ट्रेलरने उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. मृत आणि जखमी कर्मचारी हे एकाच कंपनीतील कर्मचारी होते.
यात चौघे जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोनेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved