अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- अभिनेता सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या अपोलो हॉस्पिटलमध्ये रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, रजनीकांत यांच्यामध्ये कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षण आढळून आली नाहीत,

पण रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे आणि त्यामुळे पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णलयात भरती करण्यात आलं आहे.
दरम्यान गेल्या 10 दिवसांपासून ते हैदराबाद याठिकाणी एका सिनेमाचं शूटिंग करत होते. नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते हैदराबादमध्ये होते.
त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. अन्नाथे या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं.
22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved