अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- कुरणांचा वाढत प्रादुर्भाव पाहता मार्च 2020 पासून बंद असलेले नगर शहरील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) सुरू झाले आहे.
याबाबतची माहिती प्रधान डाकघरचे प्रवर अधीक्षक जे. टी. भोसले यांनी दिली. दरम्यान नगर शहरातील पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय थांबली आहे.
लाॅकडाऊनमुळे पासपोर्टची प्रक्रिया बंद पडली होती. ज्यांना उपचार, शिक्षण व अन्य कारणासाठी तातडीने परदेशात जावे लागणार होते. त्यांना पुण्यातील कार्यालयात पासपोर्ट काढण्यासाठी जावे लागत होते.
लॉकडाऊन जसजसे शिथिल झाले, तसे परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आिण शहरातील पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. अखेर २१ डिसेंबरपासून शहरातील पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांना पासपोर्ट काढावयाचा त्यांनी पासपोर्टच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अपाॅइंटमेंट घ्यावी. तसेच नगर येथील पासपोर्ट कार्यालयात दररोज 50 जणांना पासपोर्ट दिले जात आहेत. या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक भोसले यांनी केले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved