सभापती कोतकर करणार उपोषण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-शहरातील पथदिव्यांचा प्रश्‍न सुटत नसल्याने, सभापती मनोज कोतकर यांनी उद्या (मंगळवारी) महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. महापालिकच्या विद्युत विभागात सध्या अधिकारी नाहीत.

शिवाय पथदिव्यांचे साहित्यही महापालिकेकडे नाही. शहरविकास आराखड्यासाठी 21 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव सभेसमोर होता. त्यावर मुदस्सर शेख, कुमार वाकळे व गणेश भोसले यांनी या कामाचा निधी कोण देणार, त्यातून नगरला काय फायदा, अशी विचारणा केली.

त्यावर नगररचनाकार राम चारठणकर म्हणाले, की जलवाहिन्या, रस्ते, गटारींचे प्रमाणीकरण करण्यात येईल. तसेच अतिक्रमणे निश्‍चित होतील. त्यामुळे महापालिकेच्या जमिनीबाबतच्या वादाचे प्रमाण कमी होईल.

मालमत्ताकराला फायदा होईल. या कामासाठी अमृत योजना, विकासभार, 15वा वित्त आयोग, आदी योजनांतून महापालिका निधी देऊ शकते. मात्र, केवळ आराखड्यासाठी एवढा निधी का, या प्रश्‍नावर चारठणकर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

अग्निशामक वाहनखरेदी निविदेला चार वेळा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेच्या निधीतूनच वाहनखरेदीचा प्रस्ताव सभेसमोर मांडला होता.

मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत, सभापती मनोज कोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे अग्निशमन वाहनखरेदीसाठी सर्व सदस्यांनी निवेदन पाठवावे, अशी सूचना केली. अग्निशमन विभागातील कर्मचारी प्रशिक्षण व संख्येबाबतच्या प्रश्‍नांवर अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ म्हणाले,

की सध्या केवळ 28 कर्मचारी असून, पुढील आठवड्यात आउट सोर्सिंगनुसार 20 कर्मचारी भरण्यात येणार आहेत. वित्त व लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांच्यावरील कारवाईच्या प्रस्तावाबाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय घ्यावा, असे सभापती कोतकर म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment