निवडणूक रणांगण! पोपटराव पवार यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  हिवरेबाजार ग्रामपंचायतसाठी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

याशिवाय तालुक्यातील मातब्बरांनीही काल आपले अर्ज भरले. यामध्ये माजी जि.प. सदस्य कालिंदी लामखडे, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, प्रवीण कोकाटे, माजी पं. स. सदस्य दत्ता सप्रे, डॉ. बबनराव डोंगरे,

माजी पं. स. सदस्य एकनाथ जाधव, तालुका दूध संघाचे पुष्पा कोठुळे, गुलाबराव कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास कर्डीले, भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा ज्योती भोर , बाजार समितीचे माजी सभापती वीलास शिंदे आदींनी अर्ज दाखल केले.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सध्या सुरु असून अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

नगर तालुक्यातील 59 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुक होत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (बुधवारी) अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची एकच झुंबड उडाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment