नादुरुस्त रस्त्यावरून होणारी वाहतूक ठरतेय जीवघेणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील अनेक रस्ते अक्षरश वाहतुकीसाठी जीवघेणे ठरत आहे. नादुरुस्त रस्त्यांमुळे दरदिवशी वाहनांचे अपघात होण्याचे व या अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे.

मात्र तरी देखील प्रशासन या विषयाबाबत गंभीर नसलेले दिसून येत आहे. नुकतेच नेवासा ते खडका फाटा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून

या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांसह ऊस वाहतूक करणा-या वाहन मालक व चालकांनी केली आहे.

नेवासा ते खडका फाटा रस्ता सध्या खूप वर्दळीचा बनला आहे.खडके परिसरामधील अनेक खेड्यांतील लोक तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात.

अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.दुचाकीस्वारांची तर या रस्त्यावर खूपच तारांबळ उडते.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दुतर्फा खडीचे ढीग पडलेले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सध्या गळीत हंगाम सुरु असल्याने रस्त्याने ऊस वाहतूकही सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

दैनंदिन वाहनांबरोबरच ऊस वाहतूक करणा-या वाहनांची संख्या वाढल्याने व त्यातच रस्ता खराब असल्याने या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment