कोण राहणार? कोण माघार घेणार? आज उमेदवारांचे चित्र स्पष्ठ होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. अनेक नवख्या इच्छुकांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहे. त्यातच आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.

कारण कि, आज सोमवार (04 जानेवारी) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या मतदारसंघासाठी 15 जानेवारीला होणार्‍या या निवडणुकीत किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार तसेच किती उमेदवार माघार घेणार हे दुपारी स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, आपला उमेदवार बिनविरोध व्हावा अथवा त्याचा विजय सोपा होण्यासाठी गावपुढारी आणि पॅनेल प्रमुख रात्री उशीरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करीत होते. या निवडणुकीत सरपंच व सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी गावपातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अर्ज दाखवळ केलेल्यांमध्ये बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आपल्याला वरचढ ठरणार्‍या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी यासाठी मातब्बरांचे रात्री उशीरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीमधील 7 हजार 234 सदस्य पदाच्या जागांसाठी 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 23 हजार 803 अर्ज दाखल झाले होते.

दाखल अर्जाची 31 डिसेंबरला रात्री उशीरापर्यंत छाननी होऊन त्यात 619 अर्ज अवैध ठरले आहेत. तर 23 हजार 184 वैध ठरले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment